उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१

रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ९
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष दशमी दुपारी १४ वाजून २७ मिनिटापर्यंत
नक्षत्र- मघा दुपारी १३ वाजून १५ मिनिटापर्यंत
योग- ब्रह्मा रात्री २३ वाजून २० मिनिटापर्यंत

करण १- विष्टि दुपारी १४ वाजून २७ मिनिटांपर्यंत
करण २- बव १ नोव्हेंबरच्या रात्री ०२ वाजेपर्यंत

चंद्रराशी- सिंह अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४१ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०४ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री १ वाजून ५७ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १५ वाजून ०८ मिनिटांनी

भरती- सकाळी ०८ वाजून ०९ मिनिटांनी आणि सायंकाळी २० वाजून ४४ मिनिटांनी
ओहोटी- रात्री ०१ वाजून २४ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून ४८ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष

मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्कार प्राप्त स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म १८७५ साली झाला. ते भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

देशाच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून १९८४ साली हत्त्या झाली.

१९८४ साली भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

२०११ साली जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली. आता तीच संख्या आठ अब्जांच्या आसपास पोहचली आहे.

You cannot copy content of this page