पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१

बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष द्वादशी रात्री २३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- चित्रा रात्री १८ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
योग- सौभाग्य रात्री २० वाजून ४३ मिनिटांपर्यंत

करण १- कौलव दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल रात्री २३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कन्या सकाळी ०७ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- उत्तररात्री ०३ वाजून २९ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १५ वाजून ३९ मिनिटांनी

भरती- सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ०३ मिनिटांनी
ओहोटी- उत्तररात्री ०२ वाजून ५६ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून २३ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपासून ते दुपारी ०१ वाजून ५१ मिनिटांपर्यंत आहे.

१ डिसेंबरच्या महत्वाच्या घटना….
१९१७ साली कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामले मामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

१९६५ साली भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली. ह्या दलात सुमारे अडीच लाख जवान आहेत. ह्या दलाचे ब्रीदवाक्य वाक्य आहे जीवन पर्यन्त कर्तव्य!

१९८० साली मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

आज आहे एड्स प्रतिबंधक दिन
१९८१ साली AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली. एच. आय. व्ही. हा विषाणूचा प्रकार असून हे विषाणू एड्स या रोगास कारणीभूत असतात. एचआयव्हीचा शोध डॉ. मॉंतेनियेर आणि डॉय गायो यांनी लावला.

१९९९ साली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.