पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष अष्टमी सायंकाळी १९ वाजून १२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्व भाद्रपदा रात्री २२ वाजून ३० मिनिटांपर्यंत
योग- सिद्धि १२ डिसेंबररच्या सकाळी ६ वाजून ०१ मिनिटांपर्यंत
करण १- विष्टि सकाळी ७ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
करण २- बव सायंकाळी १९ वाजून १२ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- कुंभ सायंकाळी १६ वाजून १५ मिनिटांपर्यंत
सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता
चंद्रोदय- दुपारी १३ वाजून ०६ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री ० वाजून २२ मिनिटांनी
भरती- पहाटे ०५ वाजून २० मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ०१ मिनिटांनी
ओहोटी- दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी
राहुकाळ- सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपासून ते दुपारी ११ वाजून ०९ मिनिटांपर्यंत
दिनविशेष- आज आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
पर्वतांच्या महत्वाविषयी जागरुकता वाढविणं, त्याचं संवर्धन आणि विकासावर लक्ष केंद्रीत करणं; या उद्देशानं दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो.
१९३० साली सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारि तोषिक जाहीर झाले.
१९४६ साली युनिसेफची स्थापना झाली.
१८८२ साली तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म झाला.
१८९९ साली थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जन्म झाला.
भाषाशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पारि तोषिक विजेते नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म १९०९ साली झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सर संघ चालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म १९१५ साली झाला.
हिंदी चित्रपट अभिनेता, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म १९२२ साली झाला.
१९३५ साली भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म झाला.
१९६९ साली भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद यांचा जन्म झाला.
२००४ साली गायिका आणि भारतरत्न व रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी आणि २०१२ साली भारतरत्न पुरस्कृत
भारतीय सतारवादक व संगीतकार पंडित रवी शंकर यांचे निधन झाले.