उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१

सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष द्वादशी अहोरात्र
नक्षत्र- उत्तरभाद्रपदा सायंकाळी १८ वाजून ०८ मिनिटापर्यंत
योग- वज्र १६ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०१ वाजून ३३ मिनिटापर्यंत

करण १- बव संध्याकाळी १९ वाजून १६ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४८ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १५ वाजून ३९ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०३ वाजून १९ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून २२ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून १५ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ५४ मिनिटांनी

दिनविशेष:- भागवत एकादशी, तुलसी विवाहरंभ, चातुर्मास्य समाप्ती

ऐतिहासिक दिनविशेष:-

१९४९ साली महात्मा गांधींच्या हत्येसाठी प्रमुख आरोपी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

१९८२ साली भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले.

१९८९ साली सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यांने आपल्या कारकिर्दीत अनेक विश्व्विक्रम आपल्या नावावर केले.

१९९९ साली रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.