पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई:- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पं‍डित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती आणि बाल दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई:- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सभापतींचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि म.वि.स. जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बाल दिनानिमित्त जवाहर बालभवन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न

मुंबई:- आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. यावर्षी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई तर्फे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा बालभवन, चर्नी रोड, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी बालभवन नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. प्रा.गायकवाड यांनी या मुलांच्या कलाकृतींची पाहणी केली व सर्व मुलांचे कौतुक केले.

या स्पर्धेकरिता ३५ शाळांमधील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे आयोजन कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांना मास्क, सॅनिटायझरची सुविधा पुरविण्यात आली.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांना बालभवन तर्फे कलर बॉक्स देण्यात आले. त्याचबरोबर सर्व मुलांना स्पर्धेत सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील चित्रांचे परीक्षण करण्यासाठी विशेष परीक्षक नेमण्यात येणार असून त्यांच्यामार्फत घोषित केलेल्या उत्कृष्ट चित्रांना जवाहर बालभवनच्या फेब्रुवारी २०२२ च्या वर्धापन दिनी पारितोषिक देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष गायकवाड तर सूत्रसंचालन श्रीमती सृजनी यमनुरवार यांनी केले. आभार आसेफ शेख यांनी मानले.

You cannot copy content of this page