उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१

रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष एकादशी १५ नोव्हेंबरच्या सकाळी ०६ वाजून ४० मिनिटापर्यंत
नक्षत्र- पूर्वाभाद्रपदा सायंकाळी १६ वाजून ३० मिनिटापर्यंत
योग- हर्षण १५ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०१ वाजून ४२ मिनिटापर्यंत

करण १- वणिज संध्याकाळी १८ वाजून ०९ मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि १५ नोव्हेंबरच्या सकाळी ०६ वाजून ४० मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कुंभ सकाळी १० वाजून १० मिनिटांनी

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४७ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १५ वाजून ०५ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री ०२ वाजून २८ मिनिटांनी

भरती- सकाळी ०८ वाजून ३२ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून २७ मिनिटांनी
ओहोटी- उत्तररात्री २ वाजून १२ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून १३ मिनिटांनी
———–

दिनविशेष:-प्रबोधिनी स्मार्त एकादशी

आज आहे जागतिक मधुमेह दिन आणि राष्ट्रीय बालदिन.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या २०१७ च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे ७ कोटींहून अधिक रुग्ण आहे. २०३४ पर्यंत जगभरात १३ कोटींहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो आहे. भारतात प्रत्येक बारा व्यक्तीमागे एक जण मधुमेहाचा शिकार असते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भारतात मधुमेहाची जगाची राजधानी बनण्यास वेळ लागणार नाही. सध्या चीननंतर भारताचा मधुमेहाच्या रुग्णांत दुसरा क्रमांक आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:-

१८८९ साली प्रथम भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने आजचा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो.

१९२२ साली बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.

१९७७ साली भारतीय तत्त्वज्ञानी ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार नारायण हरी आपटे स्वर्गवासी झाले.

२०१३ साली सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट निवृत्ती घेतली.