पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१

गुरुवार दिनांक ०२ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष त्रयोदशी रात्री २० वाजून २७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- स्वाती सायंकाळी १६ वाजून २७ मिनिटांपर्यंत
योग- शोभन सायंकाळी १६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत

करण १- गरज दुपारी १० वाजून ०४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टि ३ डिसेंबरच्या सकाळी ०६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज रात्री २० वाजून २७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- तुळ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- पहाटे ०४ वाजून २९ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १६ वाजून २३ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून ४५ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ५१ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०३ वाजून ५३ मिनिटांनी आणि दुपारी १६ वाजून ०६ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी ०१ वाजून ५१ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे.

दिनविशेष: आज आहे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव

सुमारे ७२५ वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला इंद्रायणी काठी संजीवन समाधी घेतली.

२ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.

१४०९ साली लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.
जर्मनीच्या फ्री स्टेट ऑफ सॅक्सनी मधील लाइपझिगमधील, हे जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे.

१९८८ साली बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्या दोनदा पाकिस्तानाच्या पंतप्रधान होत्या.

१९८९ साली भारताच्या ८ व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी झाला.

१९३७ साली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म झाला.

२०१४ साली महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन झाले. केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री म्हणूनही त्यांनी कार्य केले.

You cannot copy content of this page