समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, अनसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे संपन्न झाला.

समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक संस्था सातत्याने गेली १५ वर्षे कोकणातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असते. `शैक्षणिक उपक्रम २०२१’ च्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक श्री योगेश नाटेकर, श्री. सुधीर लब्दे, श्री. सिद्धेश लब्दे आणि श्री. अनिल घरकर यांच्या शुभहस्ते अनसुरे गावातील श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर ह्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना लागणारी स्कूलबॅग, वह्या, पेन, कोरोना प्रतिबंधक मास्क असे विविध शैक्षणिक साहित्य होते. यावेळी श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर अणसुरे प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय मांडवकर सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

श्री योगेश नाटेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक संस्था नियमितपणे शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमाद्वारे अनेकविध उपक्रम घेत असते. वैद्यकीय शिबिरं घेऊन ग्रामीण भागातील गरजूंवर मोफत औषधोपचार केलं जातात. कोरोना काळात ग्रामीण भागात ह्या संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

You cannot copy content of this page