पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१

रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ३०
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष द्वितीया सायंकाळी १९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- रोहिणी सकाळी ०७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
योग- सिद्ध २२ नोव्हेंबरच्या पहाटे ०५ वाजून ४८ मिनिटापर्यंत

करण १- गरज सायंकाळी १९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृषभ रात्री २१ वाजून ०९ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- सायंकाळी १९ वाजून ४७ मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ०८ वाजून २२ मिनिटांनी होईल

भरती- रात्री ०० वाजून ५७ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ३७ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी १६ वाजून ३६ मिनिटांपासून सायंकाळी १७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत
————
दिनविशेष:-
जागतिक मत्स्य पालन दिन
जागतिक दूरदर्शन दिन
हुतात्मा स्मृती दिन

२१ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना.

१९७१ साली भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक झाली. पुढे पाकिस्तानचा सपशेल पराभव झाला आणि बांग्लादेशची निर्मिती झाली.

१८७७ साली थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

१९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

१९७० साली नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page