स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

तळेरे- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ स.९.३० वा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

स.१०.०० वा. १० वी.१२.वी विद्यार्थी बक्षिस वितरण समारंभ तसेच आकाश कंदील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ तर सकाळी ११.०० वा.श्री.खर्जादेवी दुधउत्पादक संस्था,तळेरेच्यावतीने दुग्ध व्यवसाय व शेती विषयक मेळाव्याला प्रा.भास्कर काजरेकर (शेती) व डाॅ. देसाई (दुग्ध व्यवसाय) याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघ तळेरेच्यावतीने श्री.विठ्ठल मंदिर तळेरे गावठण दु.१.०० वा. विशेष प्रविण्यप्राप्त विद्यार्थी आणि समाजसेवी व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व.सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर व वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page