उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार २३ ऑगस्ट २०२१

मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- २
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष द्वितीया सायंकाळी १६ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पूर्व भाद्रपदा सायंकाळी १९ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
योग- सुकर्मा सकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत आणि त्यांनतर धृति २५ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत

करण १- गरज सायंकाळी १६ वाजून ०४ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज २५ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजून ०६ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कुंभ दुपारी १३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५८ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- रात्री २० वाजून ३१ मिनिटांनी आणि
चंद्रास्त- सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ३४ मिनिटांनी
भरती- रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून १७ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे मंगळागौरी व्रत.

ऐतिहासिक दिनविशेष:

१८३३ साली गुजराती साहित्यिक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे यांचा जन्म झाला.
१८७२ साली मराठी साहित्यिक; ‘मराठा’, केसरी वृत्तपत्रांचे संपादक नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म झाला.
१९०८ साली भारतीय क्रांतिकारक, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म झाला.

मृत्यू:-
१९२५ साली प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर)
१९९३ साली भारतीय क्रिकेट खेळाडू प्रा. दि. ब. देवधर यांचा मृत्यू झाला.