राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजन केले होते. ऑनलाईन स्वरुपात झालेल्या या काव्य स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला होता. कमीत कमी शब्दांत आशयघन व प्रेरणादायी शब्दरचना याशिवाय लेखनातील रचनावृत्त शब्दलयता इत्यादी अन्य निकष यासाठी निश्चित केले होते.

यामध्ये राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. मेधा साबाजी पत्की ( दोडामार्ग-सिंधुदुर्ग), द्वितीय क्रमांक विभागुण श्री तुषार सूत्रावे ( उस्मानाबाद), सौ. पुर्णिमा देसाई ( गोवा) व श्रीमती रंजना शिंदे ( कांदिवली) यांना तर तृतीय क्रमांक विभागून डॅा.श्री संदीप पाटणकर ( मुंबई) व सौ. सरोज सुरेश गाजरे ( भाईंदर) या कवींना मिळाला आहे.

याशिवाय विशेष उत्तेजनार्थ उल्लेखनिय कविता कवी सौ.कविता आमोणकर ( मडगाव गोवा ), सो.सुलभा दि.लोहकरे ( मुंबई), कु.देवश्री मनिष नाईक (अकोला),सॊ.अनुराधा गिरीष वाळिंबे ( नांदेड), सौ. सायली शेजवळ ( कल्याण), वैष्णवी गिरीष वाळींबे ( नांदेड) यांना प्राप्त झाला आहे. सहभागी इतर सर्व कविवर्यांना संस्था परिवारातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंदसर व संस्था संबंधित मराठी भाषा व समीक्षण क्षेत्रातील अभ्यासक व मान्यवरांचे यामध्ये विशेष मार्गदर्शनपर योगदान लाभले.