उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार २३ ऑगस्ट २०२१

सोमवार दिनांक २३ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- १
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष प्रतिपदा सायंकाळी १६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- शततारका सायंकाळी १९ वाजून २५ मिनिटांपर्यंत
योग- अतिगंड सकाळी ०८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

करण १- कौलव सायंकाळी १६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
करण २- तैतिल २४ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- कुंभ अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५८ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- सायंकाळी १९ वाजून ५३ मिनिटांनी आणि
चंद्रास्त- सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजता
भरती- रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे श्रावणी सोमवार आणि शिव पूजन. आजच्या दिवशी महादेवाचे मनोभावे स्मरण करून पूजा करण्याची परंपरा आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:
२३ ऑगस्ट १९९१ रोजी वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

२३ ऑगस्ट १९९७ रोजी हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना होती.

मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक कविवर्य विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म सिंधुदुर्गातील धालगल या गावी २३ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. त्यांना २३ ऑगस्ट २००५ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.