उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार २८ ऑगस्ट २०२१

शनिवार दिनांक २८ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती भाद्रपद- ६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण कृष्णपक्ष षष्टी रात्री २० वाजून ५५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- भरणी २९ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
योग- ध्रुव अहोरात्र
करण १- गरज सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज रात्री २० वाजून ५५ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ५४ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- रात्री २२ वाजून ५१ मिनिटांनी आणि
चंद्रास्त- सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ०९ वाजून ०८ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ३९ मिनिटांनी
भरती- पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून १७ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे अश्वत्थ मारुती पूजन.

ऐतिहासिक दिनविशेष:

१९२८ साली भारतीय पदार्थ वैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म झाला.
१९२८ साली सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म झाला. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्म-विभूषण व कालिदाससन्मान पुरस्कार प्राप्त झाले.
१९३४ साली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म झाला.
१९६९ साली भारतीय थोर स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन झाले.
२००१ साली लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन झाले.