पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१

शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक कृष्णपक्ष सप्तमी २७ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजून ४३ मिनिटापर्यंत
नक्षत्र- आश्लेषा रात्री २० वाजून ३५ मिनिटांपर्यंत
योग- ब्रह्मा सकाळी ८ वाजेपर्यंत

करण १- विष्टि सायंकाळी १७ वाजून १७ मिनिटांपर्यंत
करण २- बव २७ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वाजून ४३ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कर्क रात्री २० वाजून ३५ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १७ वाजून ५७ मिनिटांनी होईल

चंद्रोदय- रात्री २३ वाजून ४७ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी

भरती- रात्री ०३ वाजून ५७ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ४० मिनिटांनी
ओहोटी- सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ३६ मिनिटांनी

राहुकाळ- सकाळी ११ वाजून ०२ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत आहे.
————

दिनविशेष: आज आहे हुंडा प्रतिबंधन दिन आणि भारतीय संविधान दिन

१९४९ साली भारताची घटना मंजूर झाली अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. २००८ साली महाराष्ट्रात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबाने मुंबईत दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला केला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते. ह्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्यांना पाक्षिक स्टार वृत्त कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

You cannot copy content of this page