ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानातील काही राज्यात विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा

नवी दिल्ली:- पर्शियन आखातात युद्ध पेटल्याने संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून इंधनाची मागणी कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या सरकारने पॅकेज जाहीर केले असून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ यांनी पॅकेजचे अनावरण करताना सांगितले की, कृषी, अन्न आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. सदर पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना इंधनावर अनुदान मिळणार असून सर्वसामान्यांसाठी विविध शहरातील सार्वजनिक वाहतूक जसे की, मेट्रो व बससेवा विनामूल्य केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार कठीण काळात लोकांना एकटे सोडणार नाही आणि सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्यात एक महिन्यासाठी तर टास्मानिया राज्यात तीन महिन्यांसाठी सार्वजनिक सेवा मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील शालेय कंत्राटी बससेवा सुद्धा मोफत केल्या आहेत.

error: Content is protected !!