मनोरी येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव २९ जुलै रोजी!
मुंबई- मालाड (पश्चिम) येथील निसर्गरम्य मनोरी डोंगरावरील मनोरी तीर्थक्षेत्रात असलेल्या परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन येथे बुधवार २९ जुलै २०२६ रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा-
उत्सवाची सुरुवात मंगळवार २८ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून बुधवार २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अखंड नामस्मरणाने होईल.
बुधवार २९ जुलै रोजी सकाळी-
५.३० वाजता श्रीगुरुमूर्तीला अभ्यंगस्नान,
८.०० वाजता स्थानिक मनोरी व गोराई म्युनिसिपल शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप,
८.३० वाजता योग संगीत चिकित्सा- योगीराज श्री भारतभूषण भारतेंदुजी महाराज
१०.०० वाजता स्वरसंगीत – निघालो घेऊन स्वामींची पालखी
दुपारी १२.३० वाजता सामूहिक होम-हवन व यज्ञविधी,
दुपारी २.३० वाजता श्रीगुरूंची महाआरती व महाप्रसाद,
दुपारी ३.०० वाजता सामूहिक श्रीगुरुपाद्यपूजन.
उत्सवादरम्यान सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या उत्सवासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूचरणी सेवा व दर्शनाचा लाभ घ्यावा; असे आवाहन वरिष्ठ भक्तजन सेवक समिती व स्वामी सेवक समितीचे विश्वस्त श्री. निशाद अमृतराव पाटणकर यांनी केले आहे.











