वाढता वाढता वाढे….. पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक!

देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. सदर निवडणुका संपताच गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पुन्हा काल उशिरा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक प्रस्थापित झाला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत तर सर्वात स्वस्त पेट्रोल पणजी येथे मिळणार आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८४.०७ रुपये प्रति लिटर एवढा झाला असून पणजीमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७०.२६ रुपये प्रति लिटर एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *