राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
नवी दिल्ली:- महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधी यांनीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.