रंग सह्याद्री- छायाचित्रकार हरेष पैठणकर यांच्या गडकिल्ल्यांच्या चित्रांचे प्रदर्शन

मुंबई:- छायाचित्रकार हरेष पैठणकर यांच्या गडकिल्ल्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जंहागीर आर्ट गॅलरी येथे ९ मार्च २०२० पासून सुरु झाले असून ते १५ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी गडकिल्ल्यांच्या चित्रांची सफर पाहायला येण्याचे निमंत्रण छायाचित्रकार हरेष पैठणकर यांनी दिले आहे.

निमंत्रण पत्रिकेत छायाचित्रकार हरेष पैठणकर म्हणतात, “मुंबई येथील जंहागीर आर्ट गॅलरी भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आर्ट गॅलरी म्हणून ओळखली जाते. ह्या ठिकाणी प्रदर्शन भरविणे प्रत्येक छायाचित्रकाराला सन्मानाचे असते. २०१६ मध्ये पुण्यात माझ्या या चित्रांच्या प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तेच प्रदर्शन मुंबई येथे आयोजित करीत आहे. नक्की या, गडकिल्ल्यांच्या चित्रांची सफर पाहायला ….आणि आपल्या मित्र -मंडळींना पण सांगा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *