`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

विविध बांधकामांसाठी सिमेंट काँक्रीटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तेव्हा `आरएमसी प्लान्ट’ उभारून ती गरज भागविली जाते. परंतु ज्या ठिकाणी `आरएमसी प्लान्ट’ उभारला जातो आणि तिथे मिक्सिंग केले जाते तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्याचे गंभीर दुष्परिणाम मानवाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होतात. ह्याबाबत आपण जागृत नागरिक म्हणून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी मी खाली काही बातम्यांच्या लिंक देत आहे. त्या प्रत्येक लिंकवर क्लिक करून आपण ती बातमी विचारपूर्वक वाचावी आणि `आरएमसी प्लान्ट’ मुळे नेमकं काय होतं? हे समजून घेऊया!

पत्रकार म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतोय. आता ही जबाबदारी गावातील प्रामाणिक, सुशिक्षित, विचारवंत ग्रामस्थांनी घ्यावी; असं मला वाटतं. संघटितपणे गावाने एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला कोणीच रोखू शकत नाही. ग्रामस्थ जर जागृत असतील तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या स्वस्वार्थी लोकांच्या कावेबाज धोरणांचा नक्कीच पाडाव होईल. अन्यथा… वेगळं काही सांगायची गरज नाही.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून बातम्या वाचा; ही विनंती!

बेकायदा आरएमसी प्लांटमुळे मीरा भाईंदरची हवा बिघडली!
https://www.mymahanagar.com/palghar/mira-bhayanders-air-quality-worsened-due-to-illegal-rmc-plant/718007/amp/

पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई!
https://www.lokmat.com/pimpri-chinchwad/action-of-pimpri-chinchwad-municipal-corporation-on-rmc-plant-at-punawale-and-chikhali-a-a900-c727/

प्रदुषणकारी पाच आरएमसी प्लांटवर कारवाई होणार!
https://www.mymahanagar.com/palghar/action-on-rmc-plant-action-will-be-taken-on-five-polluting-rmc-plants-rnc/775946/amp/

Pimpri Chinchwad: तातडीने बंद करा आरएमसी प्लांट!
https://civicmirror.in/city/pimpri-chinchwad/pimpri-chinchwad-shut-down-rmc-plant-immediately/cid1712560254.htm

गुगलवर सर्च मारल्यानंतर अशा अनेक बातम्या वाचावयास मिळतील. वाचेल तो वाचेल!

-नरेंद्र हडकर