मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ- सुप्रसिद्ध सनदी लेखापाल विट्टेश्वर पेरियनाडार यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

मुंबई:- दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून सुप्रसिद्ध सनदी लेखापाल (Chartered Accountant), सामाजिक कार्यकर्ते विट्टेश्वर पेरियनाडार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज नुकताच दाखल केला आहे. विश्वामध्ये भारताला सामर्थ्यवान करण्यासाठी विट्टेश्वर पेरियनाडार यांच्याकडे सुनियोजित कार्यक्रम असून त्यानुसार गेली वीस वर्षे ते समर्पित वृत्तीने कार्य करीत आहेत. उच्चशिक्षित, सुसंस्कारीत, आध्यात्मिक असलेल्या विट्टेश्वर पेरियनाडार यांनी सामर्थ्यवान भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

राजकारणाच्या बजबजपुरीत मतदारांना किळस आलेला असताना विट्टेश्वर पेरियनाडार यांच्यासारखे आदर्शवादी व्यक्तिमत्व निवडण्याची संधी दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील मतदारांना प्राप्त होणार आहे.

“देशातील प्रत्येकाला विनामोबदला दर्जेदार आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा मिळणे अत्यावश्यक असून भ्रष्टाचार मुक्त भारत झाल्यास देश विश्वात खऱ्या अर्थाने समर्थ होऊ शकतो. देशातील प्रत्येकाला रोजगार मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे गरिबीचे उच्चाटन होऊन दोन वेळच्या अन्नासाठी जनतेला त्रास सहन करावा लागणार नाही. कुपोषणग्रस्त भारताचे चित्र बदलावे लागेल. पर्यावरणाचे रक्षण करून व जागतिक तापमान वाढ ह्या गंभीर प्रश्नावर ह्या क्षणापासून तीव्र गतीने सुनियोजित कार्य करून देशाचाच नाहीतर जगाचा विनाश थांबविणे गरजेचे आहे.” असे महत्वाचे विचार विट्टेश्वर पेरियनाडार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मांडले.

सुप्रसिद्ध सनदी लेखापाल (Chartered Accountant), सामाजिक कार्यकर्ते विट्टेश्वर पेरियनाडार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताना सेवानिवृत्त निवडणूक अधिकारी मोहन सावंत, पत्रकार नरेंद्र हडकर, तरुण उद्योजक युवराज डामरे, अनेक नामवंत मान्यवर तसेच शेकडो मतदार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

—————————————

Well-known Chartered Accountant Vitteswar Perianadar’s candidature application filed from South-Central Lok Sabha Constituency

Mumbai: Well-known Chartered Accountant, social activist Vitteswar Periyanadar has recently filed his application as an independent candidate from South Central Lok Sabha constituency. Vitteswar Perianadar has a well-planned program to make India streghten in the world and he has been working towards it with dedication for the past twenty years. Highly educated, cultured, spiritual Vitteswar Periyanadar said to our correspondent that he will give priority to realizing the dream of a streghten India and to solve all the problems of the voters of South Central Lok Sabha constituency.

Voters in South Central Lok Sabha constituency will get a chance to elect an idealistic personality like Vitteswar Perianadar when voters are fed up with the bad of politics.

“It is essential that everyone in the country gets quality health care and education facilities free of charge and if India becomes corruption free, the country can become truly powerful in the world. If everyone in the country gets employment, poverty will be eradicated and people will not have to suffer for two meals a day. This will change the picture of undernourished India.While protecting the environment, it is necessary to stop the destruction of the country or the world by doing a well-planned work on this serious issue of global warming from this moment.” Such important thoughts were expressed by Vitteswar Periyanadar while expressing his feelings.

While Well-known Chartered Accountant, Social Activist Vitteswar Perianadar filing as an independent candidate Retired election officer Mohan Sawant, Journalist Narendra Hadkar, Young entrepreneur Yuvraj Damre, many eminent dignitaries and hundreds of voters were present to greet him.

You cannot copy content of this page