ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार रेल्वे प्रवाशांना दिलासा!
रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावला!
कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागणीनुसार कणकवलीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागी लावण्यात आला.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने ५ मे २०२२ रोजी जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर प्रशांत सावंत यांच्याजवळ रेल्वेच्या डब्यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट नंबर १ वर पूर्वीच्या ठिकाणी लावण्याबाबत निवेदन दिले होते. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या निवेदनानुसार ०९ मे २०२२ रोजी कणकवली रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी रेल्वेच्या डब्यांची यांची स्थिती दर्शविणारा फलक व रिझव्हेसन चार्ट फलाट क्रमांक १ वर पूर्वीच्या जागी लावण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली. त्याबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. रवींद्र आर. कांबळे यांचे संघटनेच्यावतीने आभार मानले.
कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!