अभिनंदनीय निवड!
सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रामाणिक आणि कार्यक्षमपणा हे गुण नेहमीच उपयुक्त असतात. त्याशिवाय सामाजिक कार्यात आपण करीत असलेल्या कार्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच सामाजिक क्षेत्रात उत्तोरोत्तर जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वाढविणारी पदं आपल्याकडे येतात. कारण आपली क्षमता भूतकाळात कार्याने सिद्ध झालेली असते. आमचे मित्र श्री. संतोष नाईक आणि श्री. मनोज तोरस्कर यांच्या बाबतीत आम्ही सन्मानाने-प्रेमाने वरील विधानं केली आहेत.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सन्मानिय श्री. संतोष नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मा. श्री. मनोज तोरस्कर यांची निवड झाली असून त्यांनी तीन वर्षात केलेल्या आदर्शवत कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतली. राष्ट्रीय कार्यकारिणीला धन्यवाद दिले पाहिजेत; कारण त्यांनी निवडलेले नेतृत्व संघटनेच्या कार्याला न्याय देतील असे आहे.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदावर श्री. संतोष नाईक आणि जिल्हा निरीक्षक पदावर मनोज तोरस्कर कार्य करीत असताना त्यांनी सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यात संघटनेचे सामर्थ्य वाढविले. जिल्ह्यातील अनेक ज्वलंत सामाजिक विषयांवर शासनाचे लक्ष वेधून घेतले. विकासाच्या मूलभूत समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. कोरोना महामारीच्या काळात तर जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी आरोग्य यंत्रणेशी नियमितपणे संपर्कात राहून अनेक त्रुटी समोर आणल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णांना दिलासा मिळाला. मानवाच्या मूलभूत अधिकारांचे जतन होण्यासाठी त्यांनी निःस्वार्थी वृत्तीने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असून त्याचीच दखल ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतली आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सन्मानिय श्री. संतोष नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मा. श्री. मनोज तोरस्कर यांची निवड केली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सन्मानिय श्री. संतोष नाईक यांची निवड झाल्याने संपूर्ण कोकणात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही मानवाच्या अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारी संघटना अधिक जोमाने कार्य करेल. श्री. संतोष नाईक यांना सामाजिक क्षेत्रात वावरण्याचा मागील तीस वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभव संपन्नतेच्या जोरावर कोकणात अनेक सामाजिक समस्यांची उकल होईल; ह्यात शंकाच नाही.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री. मनोज तोरस्कर यांची निवड सुद्धा अभिनंदनीय असून एक प्रामाणिक, कार्यक्षम, होतकरू, उच्चशिक्षित अभियंता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात यापुढेही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही संस्था अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे दाद मागेल.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सन्मानिय श्री. संतोष नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मा. श्री. मनोज तोरस्कर यांची निवड झाल्याबद्दल पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
-नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक स्टार वृत्त
https://starvrutta.com