गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन- उद्या अंत्यसंस्कार

पणजी:- देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे त्यांच्या दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात शोकाकूल वातावरण आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उद्या संध्याकाळी ५ वाजता पणजीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी ११ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत पणजीच्या कला अकादमीत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाठी ठेवण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page