जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट; तर दि.९ ते ११ जून रोजी ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून २०२४ रोजी यलो अलर्ट तर दि. ९ ते ११ जू
न २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि.७ व ८ जून २०२४ या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. ७ जून रोजी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दि. ९ ते ११ जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी:
१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत; तसेच दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
२) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
३) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
४) विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकरणापासून व विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
५) जर विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
६) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप ‘ डाऊनलोड करून घ्यावे.
कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
१) जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835.
२) पोलीस नियंत्रण कक्ष – 02362-228614 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112.
३) दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष – 02363-256518.
४) सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028.
५) वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष – 02366-262053
६) कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष – 02362-222525.
७) मालवण तालुका नियंत्रण कक्ष – 02365-252045
८) कणकवली तालुका नियंत्रण कक्ष – 02367-232025
९) देवगड तालुका नियंत्रण कक्ष – 02364-262204
१०) वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष – 02367-237239
दि. ७ जुन ते ११ जुन पर्यंतच्या हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf या संकेतस्थळावरून उपलब्ध आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री क्रमांक – 1077 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.