पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत विरोधकांचा धुव्वा! सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता संपादन केली!

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा बहुमतात सत्ता आली. विरोधकांचा सपशेल पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांसमोर ठेवलेल्या मुद्द्यांना मतदारांचा भरगोस पाठिंबा मिळाला. देशात एनडीएला ३५१, युपीएला ८६ आणि इतरांना १०५ जागा मिळाल्या.

यूपीएच्या १० वर्षांच्या राजवटीनंतर २०१४ मध्ये पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले होते. २०१९ चा मतदारांचा कौल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात पडला. विरोधकांची रणनीती अयशस्वी झाली.

पं. जवाहरलाल नेहरु व इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९५१-५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेतील जवळपास तीन चतुर्थांश म्हणजेच ४८९पैकी ३६४ जागा मिळवत बहुमत मिळवले होते. त्यानंतर झालेल्या १९५७ व १९६२ च्या निवडणुकादेखील नेहरुंनी पूर्ण बहुमताने जिंकल्या. नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९५७ मध्ये ३७१ तर, १९६२मध्ये ३६१ जागा जिंकल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९६७ मध्ये ५२०पैकी २८३ जागा व १९७१च्या निवडणुकीत ३५२ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतात सत्ता मिळवली.

You cannot copy content of this page