ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी कणकवली मध्ये शिवाजी चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व कणकवली तालुका अध्यक्ष हनीफभाई पिरखान व कणकवली तालुका सचिव मनोजकुमार वारे सदस्य भरत तळवडेकर ,सादिक कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात शिव पुतळ्याला मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांनी पुष्पहार अर्पण केला सोबत जनसंपर्क अधिकारी महेश मयेकर व सदस्य उपस्थित होते.

देवगड तालुकाध्यक्ष योगेश उर्फ बाळा धुपकर व सदस्य, वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रकाश नारकर, उपाध्यक्ष दशरथ बोबकर व अन्य पदाधिकारी व सदस्य तसेच सावंतवाडी तालुकाध्यक्ष मोहिनी मडगावकर पदाधिकारी व सदस्य त्याचबरोबर कुडाळ तालुकाध्यक्ष डॉ.अरुण गोडकर, कार्याध्यक्ष डॉ.वैभव आईर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष डॉ. आर. एम. परब यांनी आपल्या तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.

You cannot copy content of this page