ओम साईधाम देवालय नुतनीकरणाचा मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ!
नुतनीकरण खासदार रविंद्र वायकर यांच्या खासदार फंडातून होणार!
मुंबई (प्रतिनिधी)- जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील पुरातन साईधाम देवालयाचे नुतनीकरण खासदार रविंद्र वायकर यांच्या खासदार फंडातून होणार असून त्याचा शुभारंभ श्रीमती मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते नुकताच साईधाम देवालयात करण्यात आला.
ओम साईधाम देवालय समितीच्या मागणीनुसार आणि माजी नगरसेवक राजू पेडणेकर व माजी नगरसेविका राजुल पटेल यांच्या प्रयत्नातून खासदार रविंद्र वायकर यांनी आपल्या फंडातून साईधाम देवालय नुतनीकरणाचे काम सुरू झाले असून त्याचा शुभारंभ खासदार रविंद्र वायकर यांच्या सुपत्नी मनिषा रविंद्र वायकर आणि सुकन्या दिप्ती रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते नुकताच साईधाम देवालयात करण्यात आला. त्यावेळी समितीचे सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार चेतन नाईक, शाखाप्रमुख परेश वाडीकर, गोविंद वाघमारे, आनंद धनावडे, कल्पना कोकणे, भरत यादव, वंदना मोरे, आशिष सुनिलसिंह, रुपाली माली आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओम साईधाम देवालय हे पुरातन असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. देवालयात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय सण उत्सव ओम साईधाम देवालय समितीच्यावतीने वर्षानुवर्षे साजरे केले जातात. सदर देवालयाचे नुतनीकरण व्हावे म्हणून समितीचे सेक्रेटरी मोहन सावंत यांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींशी लेखी पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले व खासदार रविंद्र वायकर यांनी देवालयाचे नुतनीकरण स्वतःच्या खासदार फंडातून करण्याचे मान्य केले.
नुतनीकरण शुभारंभ कार्यक्रमाच्या वेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य मुग्धा सावंत, सुधा बामणे, विजया बनसोडे, स्मिता जाधव, प्रिती गुप्ता, सावित्री भट, कमल शिंदे,मीनल मुंगी, रविंद्र कबीर,चेतन नाईक, इक्बाल सुलेमान, शुभम ठाकुर, प्रकाश सोनाळकर, सत्येंद्र पंड्या, विष्णु भट, नागनाथ नांदुरकर, अनिता सक्षम, बाळकृष्ण राव, निता क्रिपलानी आणि पाटलीपुत्र नगर, आनंद नगर परिसरातील रहिवासी,साईभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला ओम साईधाम देवालय समितीच्यावतीने खासदार सुपत्नीचे, कन्येचे व शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे सरोज शनीश्चर, आशा सोनाळकर यांनी औक्षण केले. प्रथम सर्वांनी साईबाबांच्या दर्शन घेतले. तेव्हा मोहन सावंत यांनी गाऱ्हाणे घातले. नंतर मोहन सावंत, लुइस पिंटो, सिध्दार्थ शुक्ला, सुनील हॉबिस्टो यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. ओम साईधाम देवालय समितीच्यावतीने मनीषा वायकर, दिप्ती वायकर,राजू पेडणेकर, परेश वाडीकर, गोविंद वाघमारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मनीषा वायकर यांनी मनोगत व्यक्त करताना खासदार रविंद्र वायकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, रविंद्र वायकर यांनी नगरसेवक, आमदार, खासदार अशा पदांवर कार्यरत राहून प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. साईधाम देवालयाचे नुतनीकरण पूर्ण झाल्यावर खासदार स्वतः उपस्थित राहतील.
यावेळी माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मोहन सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.











