राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर
२१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई:- राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १०,३२० नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज निदान झालेले १०,३२० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३),नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३),उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१) , मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१),अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
- मुंबई: बाधित रुग्ण- (१,१४,२८४) बरे झालेले रुग्ण- (८७,०७४), मृत्यू- (६३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५६३)
- ठाणे: बाधित रुग्ण- (९३,३४२), बरे झालेले रुग्ण- (५८,८३६), मृत्यू (२५८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२०)
- पालघर: बाधित रुग्ण- (१५,६१९), बरे झालेले रुग्ण- (९३२३), मृत्यू- (३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९६९)
- रायगड: बाधित रुग्ण- (१६,५३८), बरे झालेले रुग्ण-(१०,८५८), मृत्यू- (३७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०५)
- रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१७००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१२)
- सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)
- पुणे: बाधित रुग्ण- (८९,२३१), बरे झालेले रुग्ण- (३७,३११), मृत्यू- (२०९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९,८२१)
- सातारा: बाधित रुग्ण- (३८७२), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६४)
- सांगली: बाधित रुग्ण- (२३४५), बरे झालेले रुग्ण- (९४०), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४२)
- कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५०६०), बरे झालेले रुग्ण- (१५९०), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३६५)
- सोलापूर: बाधित रुग्ण- (९१२९), बरे झालेले रुग्ण- (४६१५), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९)
- नाशिक: बाधित रुग्ण- (१४,७५०), बरे झालेले रुग्ण- (८९३१), मृत्यू- (४६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५७)
- अहमदनगर: बाधित रुग्ण- (४७४०), बरे झालेले रुग्ण- (२७६०), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९९)
- जळगाव: बाधित रुग्ण- (१०,८२६), बरे झालेले रुग्ण- (७३८५), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२३)
- नंदूरबार: बाधित रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८४)
- धुळे: बाधित रुग्ण- (३०६१), बरे झालेले रुग्ण- (१९४३), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१५)
- औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३,८९६), बरे झालेले रुग्ण- (८२५०), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१६४)
- जालना: बाधित रुग्ण- (१९४०), बरे झालेले रुग्ण- (१४३४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२)
- बीड: बाधित रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४६८)
- लातूर: बाधित रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५८)
- परभणी: बाधित रुग्ण- (६४३), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८६)
- हिंगोली: बाधित रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)
- नांदेड: बाधित रुग्ण- (१६९५), बरे झालेले रुग्ण (७४६), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७४)
- उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९७१), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)
- अमरावती: बाधित रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३७०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०४)
- अकोला: बाधित रुग्ण- (२५९३), बरे झालेले रुग्ण- (१९५१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२६)
- वाशिम: बाधित रुग्ण- (५९१), बरे झालेले रुग्ण- (३६१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१८)
- बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (६८५), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)
- यवतमाळ: बाधित रुग्ण- (९४३), बरे झालेले रुग्ण- (५०८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)
- नागपूर: बाधित रुग्ण- (४८३५), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३१)
- वर्धा: बाधित रुग्ण- (१९६), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)
- भंडारा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)
- गोंदिया: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)
- चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)
- गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६९), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)
- इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०)
- एकूण: बाधित रुग्ण-(४,२२,११८) बरे झालेले रुग्ण-(२,५६,१५८),मृत्यू- (१४,९९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५०,६६२)
(टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)