मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी
मुंबई:- लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत ९७ लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.
आज दिवसभरात सुमारे ३ लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.
महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे १० लाख डोसेस होते. आज ४.५९ लाख डोस मिळाले आहेत.