सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे:- (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.)
दोडामार्ग – 119(2145), सावंतवाडी – 130(2380.10), वेंगुर्ला – 145(1956), कुडाळ – 144(2159), मालवण – 190(2708), कणकवली – 240(2374), देवगड – 200(2084), वैभववाडी – 170(2281), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page