कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.1 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1042.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत:-
दोडामार्ग – 44(1160), सावंतवाडी – 84(1293.7), वेंगुर्ला – 53.8(806.2), कुडाळ – 82(913), मालवण – 97(1001), कणकवली – 105(1156), देवगड – 58(885), वैभववाडी – 45(1126), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page