मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग- 33(3777), सावंतवाडी- 46(4191.1), वेंगुर्ला- 37(3119.8) कुडाळ- 27(3800), मालवण- 47(4188.96),  कणकवली- 07(4202), देवगड – 12(3344),  वैभववाडी- 30(4412) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page