सावधान- लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०० गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक

मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५०० गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप- १९६ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २०६ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २७ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५८ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६२ आरोपींना अटक.

■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

चंद्रपूर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद

■ गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट विविध व्हाट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यामुळे परिसरातील शांतता बिघडून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

अधिकृत संकेतस्थळच पहावे
लॉकडाऊनमुळे सोशल मिडिया, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शक्यतो ऑनलाईन पुस्तके, साहित्य, गाणी, चित्रपट, वेबसेरीज व अन्य गोष्टी अधिकृत संकेतस्थळावरून पहाव्यात. अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर पाहणे हा कायद्याने गुन्हा आहेच, तसेच अशा संकेतस्थळांवरून नकळत एखादे malware किंवा computer virus डाऊनलोड होऊन लॅपटॉप, computer किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

You cannot copy content of this page