सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्यचा ग्रामसेवक यांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात येतात.

देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक प्रदिप रमेश नारकर
कुडाळ तालुक्यातील कवठी ग्रामपंचातीचे ग्रामसेवक सतिश श्रीधर साळगावकर
मालवण तालुक्यातील कातवड घुमडे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक युती युवराज चव्हाण
कणकवली तालुक्यातील नरडवे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक वैभव विनायक धुमाळ
दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचातीचे ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब
वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचातीचे ग्रामसेवक शरद श्रीरंग शिंदे
वैभवाडी तालुक्यातील गडमठ ग्रामपंचातीचे ग्रामसेवक सुनिल मनोहरराव नागरगोजे
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचातीचे ग्रामसेवक अमित आत्माराम राऊळ

यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page