10 वीच्या विद्यार्थ्यांच्या गुण नोंदीतील त्रुटी दूर करण्यासाठी विभागीय मंडळाशी संपर्क करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.5:- माध्यमिक शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना च्या त्रुटी दूरकरण्यासाठी संबंधिताच्या मूळ अभिलेखासह दिनांक 5 जुलै 2021 ते दिनांक 9 जुलै 2021 या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाशी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा; असे आवाहन प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे असे डॉ अशोक भोसले सचिव राज्यमंडळ, पुणे यांनी केले आहे.

प्रसिध्दीपत्रकाव्दारे म्हटले आहे, संगणक प्रणालीमध्ये विहित मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरलेले नाहीत. विद्यार्थीनिहाय गुण भरले, निश्चित केले नाहीत. विद्यार्थींनिहाय गुण भरले, निश्चित केले पण त्रुटी राहील्या, चुका झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयांचे, भागाचे गुण,श्रेणी भरलेले नाहीत. इयत्ता 9 वी, इयत्ता 5 वी, ते 9 वी (लागू असल्याप्रमाणे) टक्केवारी भरलेली नाही. पुर्नपरीक्षार्थीच्या बाबतीत श्रेणी विषयाची श्रेणी दर्शवितांना सध्याच्या तीन श्रेणी विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे जुने श्रेणी विषय असल्यास 4 श्रेणी 1,2,3, श्रेणी दर्शविण्यात आलेली आहे. उशिराने आवेदनपत्र भरल्यामुळे बैठक क्रमांक प्राप्त झाला नाही व त्यामुळे संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांचे गुण,श्रेणी भरता आले नाही.आवेदन पत्र भरताना परीक्षार्थी प्रकार 1.नियमित, 2पुर्नपरीक्षार्थी, 3खाजगी, 4तूरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी चुकल्याने संगणक प्रणालीत गुण श्रेणी भरता आले नाही. आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांना विषयास सूट असताना प्रविष्ट दाखविणे प्रविष्ट असताना सूट दाखविणे यामुळे संगणक प्रणालीत गुण श्रेणी भरता आले नाही.

सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक व इतर सर्व संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी.

You cannot copy content of this page