मागील आठवड्यातील महाराष्ट्र शासनाचे निर्णय आणि घडामोडी

दि. १४ जून २०२० ते २० जून २०२० या कालावधीत शासनस्तरावरील विविध निर्णय, घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा.

१४ जून २०२०

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा यासाठी पुढाकार.

वंदेभारत अभियानांतर्गत ७२ विमानांमधून ११ हजार ६६६ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३१३, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७२९, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३६२४

मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – 19’ साठी विशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 1 लाख 11 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे सुपुर्द.

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत फेसबुकचा वापर करण्याचा निर्णय. यासाठी फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत. ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी. एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास संबंधित पेढीला फेसबुकच्या पेजवर मागणी करुन रक्तदानाबाबत संदेशाचे प्रसारण करणे शक्य, यामुळे वेळेवर आवश्यक गटाचे रक्त उपलब्ध होण्यास सहाय्य.

महाराष्ट्र सायबर विगामार्फत लॉकडाऊनच्या काळात ४७७ गुन्हे दाखल, २५८ लोकांना अटक.

कोविड संदर्भात पोलिसांमार्फत अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ७८ हजार पासेसचे वाटप, १ लाख २९ हजार गुन्हे दाखल, ७ कोटी ४५ लाखांचा दंड.

१६३२ रुग्णांची घरी रवानगी, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजार ९७८, आज ३३९० नवीन रुग्णांचे निदान, सध्या ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू, १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.

१५ जून २०२०

​उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार.​ यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.

​​ठळक मुद्दे- गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे हे लहान पाऊल भविष्यात मोठी उलाढाल करणारी झेप ठरणार, आज सुमारे सोळा हजार कोटी रुपयांचे तर नजीकच्या भविष्यकाळात आठ हजार कोटींचे सामजंस्य करार करण्यात येणार. ​इतर देशातून येणा-या उद्योगांसाठी चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव. विविध परवान्याऐवजी 48 तासांत महापरवाना दिला जाणार. औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार. सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम- एक्सॉन मोबिल (अमेरिका) ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी, हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक- 2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार, असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी, वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी, हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार, एपिजी डिसी (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार, इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाइन – रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन (चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500, इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500, रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी, यूपीएल (भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000, ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाइल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042, वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या.

रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा, (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९, आज २७८६ नवीन रुग्णांचे निदान, ५० हजार ५५४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू. १७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.

कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८३ हजार ४८५ पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण, ५ लाख ८७ हजार व्यक्तीं क्वारंटाइन, २२ मार्च ते १४ जून या कालावधीत १,३०,२९७ गुन्ह्यांची नोंद, २६,६५४ व्यक्तींना अटक विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ५५ लाख ७३ हजार ३५२ रुपयांचा दंड, पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६५ घटना, त्यात ८४९ व्यक्तींना ताब्यात, अवैध वाहतूक करणाऱ्या १३३३ वाहनांवर गुन्हे दाखल ८२,३१७ वाहने जप्त.

पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांची घरी रवानगी, आज ५ हजार ७१ रुग्णांना सोडण्यात आले, मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ रुग्णांची घरी रवानगी, ५६ हजार ४९ रुग्ण बरे, दि. २९ मे रोजी राज्यात ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिली वेळ. पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत बैठक, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित.
ठळक मुद्दे – विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु करा, इतरत्र ऑनलाइन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवा. शाळा सुरु करण्याची कार्यप्रणाली- प्रारंभी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सभेचे आयोजन, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय ही कामे प्राधान्याने करणार, पालकांच्या मनातली भीती कमी करण्यासाठी विशेष सभा, येईल. बाल रक्षक व शिक्षकांमार्फत शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवणी, सरल प्रणालीचे अद्ययावतीकरण, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था, गुगल क्लासरूम, वेबिनार डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक तत्वावर वापर, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल एपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती. शाळा सुरू करण्याचे नियोजन – रेड झोन मध्ये नसलेल्या ९ वी , १०वी आणि १२ वीच्या शाळा/महाविद्यालये- जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्ट, वर्ग ३ ते ५ सप्टेंबर, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर. शाळा सुरु होणार नसलेल्या ठिकाणी टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने पथदर्शी प्रकल्प, पहिली, दुसरीसाठी ऑनलाइन नाही, ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन शिक्षण, कोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती

१६ जून २०२०

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे झालेल्या मृत्यूच्या नोंदिबाबतचा शासनाचा खुलासा – कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहितीची नोंद विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर, शासनामार्फत या माहितीची स्वत:हून फेरतपासणी, समायोजन केलेली माहिती वेबपोर्टलवरद्वारे सार्वजनिक. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असे राज्य शासनामार्फत स्पष्ट. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या आयसीडी- 10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही, त्याचे पालन करणे बंधनकारक, शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, 2020 पासून कोविड-19 प्रकरणाची पडताळणी, त्यानुसार समायोजन करण्याची कार्यवाही, दि.15 जून 2020 पर्यंत 1 लाख 10 हजार 744 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, त्यापैकी 50 हजार 554 (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण, 4 हजार 128 मृत्यूंची नोंद, 56 हजार 49 रुग्ण बरे, या डाटाची फेरतपासणी केल्यावर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखी 862 आणि राज्यात 466 मृत्यू आढळले, या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटिव्ह, या सर्व प्रकरणांची डेथ इन कोविड पॉझिटिव्ह म्हणून नोंद.

वंदेभारत अभियानांतर्गत 78 विमानांद्वारे विविध देशातून 12974 प्रवासी मुंबईत दाखल, यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 4841, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4119, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4014.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत लॉकडाऊनच्या काळात 480 गुन्हे दाखल, 258 लोकांना अटक.

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 85 हजार पासेसचे पोलिसांमार्फत वाटप 6 लाख 17 हजार व्यक्ती क्वारंटाइन,7 कोटी 65 लाखांचा दंड.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे मे महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्वेक्षण, महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश, या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प, लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचा निष्कर्ष. सहा जिल्ह्यांचा तपशील बीड – (घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह : ४, पॉझिटिव्ह प्रमाण: १.०१),परभणी- (घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह: ६,पॉझिटिव्ह प्रमाण: १.५१) ,नांदेड- (घेतलेले नमुने: ३९३, पॉझिटिव्ह: ५, पॉझिटिव्ह प्रमाण: १.२७),सांगली- (घेतलेले नमुने:४००, त्यापैकी पॉझिटिव्ह: ५, पॉझिटिव्ह प्रमाण: १.२५),अहमदनगर-(घेतलेले नमुने:४०४,त्यापैकी पॉझिटिव्ह: ५,पॉझिटिव्ह प्रमाण: १.२३),जळगाव – (घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह: २, पॉझिटिव्ह प्रमाण: ०.५), (एकूण नमुने: २३८५, त्यापैकी पॉझिटिव्ह : २७, पॉझिटिव्ह प्रमाण: १.१३)

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात कर्तव्य बजावलजेल्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन सन्मानित करण्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची घोषणा.

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आयजेएम)’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्रातील बालगृहे, बाल निरीक्षण गृहे यांच्याकरिता ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा’ आणि राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्र) आयोजित. ठळक मुद्दे- लॉकडाऊनच्या काळात बालगृहांमधील व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना वेगळ्या पद्धतीने प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब आवश्यक, मुलांना प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकविणे ही काळाची गरज, बालगृहातील मुलांना आरोग्य, स्वच्छता, मास्कचा वापर याविषयी प्रशिक्षित करणे आवश्यक.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक थांबवण्यात आल्याने त्रैमासिक /मासिक पास काढलेल्या प्रवाशांना मुदतवाढ देण्याचा तसेच ज्यांना परतावा पाहिजे असल्यास त्यांना परतावा देण्याचा, निर्णय घेतल्याची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांची माहिती,

रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के, १८०२ रुग्णांची घरी रवानगी, घरी गेलेले रुग्ण ५७ हजार ८५१ , आज २७०१ नवीन रुग्णांचे निदान, ५० हजार ४४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू, आज ८१ मृत्यूंची नोंद.

१७ जून २०२०

वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानाद्वारे १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४९८९, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ४३६४, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ४१०३

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचे हस्तांतरण आणि ठाणे येथील १००० खाटांच्या कोरोना रुग्णालयाचे ई-लोकार्पण. ठळक मुद्दे- कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची यंत्रणांकडून किमया. बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालयांची युद्ध पातळीवर उभारणी. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या पुढे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटांची उपचारासाठी निर्मिती. मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १००० खाटा असलेल्या सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती, देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयुची सुविधा उपलब्ध नाही. ट्रॅकिंग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावी मध्ये प्रयोग यशस्वी. बीकेसीवरील टप्पा २ रुग्णालय सुविधा- १२०० खाटांचे आयसीयू, डायलेसिस सुविधा.(१००८ बेडस् आयसीयू, १२ बेडस् डायलेसिससाठी), ४०६ बेडस् विना ऑक्सिजन आणि ३९२ बेडस् ऑक्सिजन सुविधेसह, सद्यस्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्णांवर या हेल्थ सेंटरमध्ये उपचार, व्हेंटिलेटर मशिन (३०), डायलिसीस मशीन (१८), आय. सी. सी. यू. बेल्स (५ फंक्शन मोटराईझ्ड बेड (१०८), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशिन, क्वारंटाईन बेड्स, ऑक्सीजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशिन, पल्स ऑक्सीमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स

ठाणे कोरोना रुग्णालयाची २४ दिवसांमध्ये उभारणी. बाळकूम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे रुग्णालय. आयसीयू बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटस्कॅन, एक्सरे सुविधा उपलबध्द.५०० बेडसला सेंट्रल ऑक्सीजनची सुविधा. ७६ बेडस हे आयसीयूचे,१० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी, १० बेडस ट्राएजसाठी , रुग्णांवर मोफत उपचार, रुग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेडसच्या निर्मितीची सुविधा.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार ३८४ पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण, ६ लाख १३ हजार व्यक्ती क्वारंटाइन,२२ मार्च ते १६ जून या कालावधीत १,३१,३७७ गुन्ह्यांची नोंद, २७,००३ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ८३ लाख १३ हजार ९०१ रुपयांचा दंड.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४८२ गुन्हे दाखल, २६० व्यक्तींना अटक,

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने ढकलण्यात आल्याची सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची माहिती.

प्रयोगशाळेत स्वत:हून तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारण्याचा निर्णय.

मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध. मुंबईकरांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन, प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धतता असेल यासाठी प्रयत्न. रुग्णवाहिकांची सेवा विनामूल्य.

सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, येथे बेडस् वाढवणार. कांदीवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात २५० बेडस वाढवणार. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेणार, ८० टक्के खाटा घेतलेल्या रुग्णालयांमध्ये समन्वयासाठी एक अधिकारी , मदतीसाठी कक्ष, लक्षणे नसलेल्या रुग्णांना थेट दाखल न करता गरजूंना दाखल करण्याविषयी या अधिकाऱ्यांकडून समन्वय.

रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के. १३१५ रुग्णांची घरी रवानगी, घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५९ हजार १६६, आज ३३०७ नवीन रुग्णांचे निदान, ५१ हजार ९२१ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के), ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईन, १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध, २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईन, आज ११४ मृत्यूची नोंद.

मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतिने आयोजित बैठकीत उद्योजकांसोबत संवाद. उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित. ठळक मुद्दे– मेड ईन महाराष्ट्रचा दबदबा वाढवण्यासाठी व जगात राज्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी एक नवा प्रकल्प सादर केल्यास त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार, सगळ्या जगाची भूक भागवण्याची महाराष्ट्राची क्षमता, असल्याने कृषी क्षेत्रात कोल्डचेन तयार करण्याची आवश्यकता, बदलत्या गरजांनुसार बदलते व्यवसाय येणे आवश्यक, त्यानुसार उद्योजकांनी नवे प्रकल्प सादर केल्यास कोणत्याही अडचणी शिवाय चोवीस तासांच्या आत सर्व परवाने, यापुढे कर्मचारी घरुनच काम करतील हे लक्षात घेऊन आवश्यक नेटवर्क ग्रामीण भागात पोहचवून ग्रामीण आणि शहरी भाग एकाच पातळीवर आणण्याचा प्रयत्न, नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी झोपडपट्ट्यांमधून लोकांचे पुनर्वसन करण्यावर भर, धारावीचे पुनर्वसन करणार, स्थलांतरित मजूर राज्यातून निघून गेले असले तरी उद्योगांना लागणारे कुशल आणि अकुशल कामगारांची कमतरता भासणार नाही, उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव, विविध परवान्याऐवजी आता 48 तासांत महापरवाना, विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत नुकतेच 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार, ऑनलाईन व्यवहारांचे महत्व लक्षात घेऊन दर्जेदार आणि गतिमान नेटवर्कचे जाळे उभारणीस प्राधान्य.

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमवेतच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचे प्रभावी सादरीकरण – ठळक मागण्या- काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता, पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता, ग्रामीण भागासाठी व्हेंटीलेटर्स, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिन्यांसाठी मुदतवाढ. इतर मुद्दे- गेल्या अडीच महिन्यात महाराष्ट्राकडून मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती, आता ३ लाख बेड्स उपलब्ध. चेस द व्हायरसला प्राधान्य. धारावीसारख्या भागातील संक्रमणास आळा.गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्रास गती. नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अशा देशांमधील १२ मोठ्या कंपन्यांसमवेत करार, यामुळे १४ हजार लोकांना रोजगार. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्यासाठी फॉर्म्युल्याची निर्मिती, ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी. यामुळे रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल. आरोग्य सुविधांमध्ये वाढ – पूर्वी:- फक्त ३ आयसोलेशन रुग्णालय, १ चाचणी प्रयोगशाळा , ३५० बेड्सची सुविधा, आज :- ९७ प्रयोगशाळा, २८२ डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल्स, ४३४ हेल्थ सेन्टर्स/ १६३१ कोविड सेन्टर्स. बेड्सची उपलब्धता : आयसोलेशन बेड्स : २ लाख ८१ हजार २९०/ऑक्सिजन बेड्स: ३७ हजार ८४५/आयसीयू बेड्स : ७ हजार ९८२/ १५४३ क्वारांटाइन सुविधांमध्ये ८० हजार बेडस. इतर उपकरणे: व्हेंटीलेटर- ३०२८ / पीपीई ५ लाख ६३ हजार ४६८, मास्क १० लाख ७७ हजार ३१३ /जम्बो विलगीकरण सुविधा –नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरण, उपचार व्यवस्था. पुणे येथे विप्रो ५०० बेड्सचे कोविड रुग्णालय कार्यान्वित. मुंबई येथे सेंट जोर्जेस रुग्णालय २०० खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय म्हणून घोषित/एमएमआरडीए येथे फेज दोन मध्ये १००० बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल सुरु, ठाणे येथे कोविड रुग्णालय सुरु.परप्रांतीय मजूर निवारा व्यवस्था – गेल्या ७५ दिवसांपासून परराज्यातील ५.५ लाख श्रमिकांची व्यवस्था. आजघडीला निवारा केंद्रांमध्ये आश्रयाला कुणीही नाही. १७ लाख परप्रांतीय कामगारांची रेल्वे, एसटीने रवानगी. ३१ मे २०२० पर्यंत ४४ हजार १०६ बस फेऱ्या. ५ लाख ३७ हजार ५९३ श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वेस्टेशन्सपर्यंत पोहचवले. परराज्यातील १२ लाख ३ हजार १३९ श्रमिकांना ८३४ रेल्वेद्वारे सोडण्यात आले. त्यांच्या तिकिटांसाठी 97.69 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून खर्च. अन्नधान्य पुरवठा – जून २०२० मध्ये आत्तापर्यंत नियमित योजनेत अन्नधान्य वितरण — १४ लाख ८० हजार ८४२ क्विंटल/प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत – ४ लाख ६ हजार ७६२ क्विंटल तांदूळ व २९ हजार ९५६ क्विंटल डाळ. एपीएल केशरीकार्डधारक- १ लाख ४६ हजार २७० क्विंटल/प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना- -९९ लाख ८० हजार लोकांना ५ किलो प्रमाणे तांदूळ वाटप, पोर्टेबिलिटीची सुविधा प्राप्त करून जून महिन्यामध्ये अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकांची संख्या १ लाख ७४ हजार ०६१, आत्मनिर्भर भारत योजना- कार्ड धारक नसलेल्या मजुरांना प्रति लाभार्थी ५ किलो अन्नधान्य आत्तापर्यंत २ लाख ७७ हजार लोकांना फायदा / शिवभोजन थाळी – ८४४ केंद्रे. जून महिन्यात आतापर्यंत १ लाख थाळ्यांचे वाटप /१ ते १५ जून या काळात १४ लाख २५ हजार ३८७ थाळ्यांचे वाटप. / एप्रिल आणि मे महिन्यात मिळून सुमारे ६० लाख थाळ्या वाटप. रोहयो : रोजगार हमी योजनेची ४८ हजार २५० कामे चालू. त्यावर ५ लाख १४ हजार ५२६ मजूर, ४ लाख ७० हजार ८६४ कामे शेल्फवर.

18 जून 2020

येणाऱ्या गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई उपस्थित. ठळक मुद्दे– यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच साधेपणाने उत्सव साजरा करणे आवश्यक. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घ्या.

‘उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने ‘अॅडव्हान्सेस इन स्मार्ट फूड प्रोससिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावरील वेबिनार संपन्न. ठळक मुद्दे- महाराष्ट्रात कृषी विकास आणि सेवा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध, 12 फूड प्रोसेसिंग क्लस्टर, सोळा हजार अन्न प्रक्रिया करणारे उद्योग, आणखी पाच फूड प्रक्रिया पार्क सुरू करण्याची शासनाची तयारी. ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात कृषीमाल उपलब्ध असल्याने त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्याची संधी, यासाठी उद्योग विभागाचे गुंतवणूकदारांना सहकार्य.

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात 484 गुन्हे दाखल, 260 व्यक्तींना अटक.

लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर राज्यात सुरु झालेल्या उद्योगधंद्यांमध्ये काम करण्यासाठी परत येत असलेल्या कामगारांची योग्य नोंद आणि थर्मल तपासणी करण्यात येत असल्याची गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची माहिती.

लॉकडाऊनच्या काळात कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 90 हजार 647 पास पोलीस विभागामार्फत वितरित. 6 लाख 10 हजार व्यक्ती क्वारंटाइन, 22 मार्च ते 17 जून या कालावधीत 1,31,627 गुन्ह्यांची नोंद, 27,159 व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी 7 कोटी 90 लाख 35 हजार रुपयांचा दंड.

वंदेभारत अभियानांतर्गत 87 विमानातून ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड,केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर या देशांमधून 14 हजार 203 प्रवासी मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 5248, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4615, इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4340.

गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून रहिवाशांवर अनावश्यकपणे निर्बंध लादू नये असे सहकार व पणन मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांचे आवाहन.

कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू, त्याद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधण्याची सुविधा.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्याच्या योजनेस जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी

रुग्ण वाढीचा वेग कमी, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ, सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांचा, रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के, आज १६७२ रुग्णांची घरी रवानगी, घरी पाठवलेल्या रुग्णांची संख्या ६० हजार ८३८, ३७५२ नवीन रुग्णांचे निदान ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार ५०४ नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के). करोना बाधित १०० रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.

19 जून 2020

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त स्तरावरील कोरोना परिस्थितीचा आढावा. ठळक मुद्दे- रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. रुग्ण सापडवणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, त्यात ढिलाई करु नका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमा, त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी कायम संपर्क ठेवा, आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत सूचना येत असतात; त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवा, प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल लगेच मिळायला पाहिजेत अशा सूचना असताना काही ठिकाणी 72 तास लागत असतील तर ते गंभीर आहे. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शिकांप्रमाणेच कार्य करा, ज्या वरिष्ठ डॉक्टर्सना कोविड उपचार करायचे नसतील त्यांना रुग्णालयात उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याविषयी सूचित करा, संगणक, स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन करणे सहज शक्य, पावसाळ्यात इतर रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळेल याकडे लक्ष द्या. रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन करा. इतर मुद्दे- रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस 21.3 वरून 23.1, रिकव्हरी रेट 50.4 असून देशाचा रिकव्हरी रेट 53.8, मृत्यूदर 3.7 वरून 4.8 टक्के,

विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय, मात्र ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी कळविल्यास त्यांच्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांची माहिती. सर्वसत्रात उत्तीर्ण अव्यवसायिक (पारंपरिक) अभ्यासक्रमातील अंतिम सत्रात असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल,त्यांच्याकडून लेखी लिहून दिल्यास विद्यापीठामार्फत अंतिम परीक्षा पास करून पदवी प्रमाणपत्र दिले जाणार, अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण, अध्यापनशास्त्र अशा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतही अशाच प्रकारचा निर्णय, यासाठी संबंधित अभ्यासक्रमासाठीच्या शिखर संस्थेची परवानगी घेणार.

सिधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात 3 कोटी 21 लाख 83 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे ऑनलाइन उद्घाटन. रेण्वीय निदान (मॉलिक्युलर) प्रयोगशाळा आणि आरसीपीटीआर कोविड तपासणी सुविधेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यातच करणे शक्य.

26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 88 लाख 48 हजार 601 थाळ्यांचे वितरण,848 केंद्रे कार्यरत, जानेवारी महिन्यात 79 हजार 918, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 31, एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 40 आणि जून महिन्यात 18 जून पर्यंत 18 लाख 39 हजार 486 थाळ्यांचे वितरण, या थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये, ग्रामीण भागात 35 रुपये. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शासनाकडून अनुदान, शहरी भागात अनुदानाची ही रक्कम 45 तर ग्रामीण भागात 30 रुपये.

दि. 1 जून ते 18 जून पर्यंत 96 लाख 38 हजार 291 शिधापत्रिका धारकांना 33 लाख 80 हजार 90 क्विंटल अन्नधान्याचे वाटप, 18 लाख 39 हजार 486 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
वंदेभारत अभियानांतर्गत 89 विमानातून 14 हजार 348 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल, यामध्ये मुंबईचे 5298, उर्वरित महाराष्ट्र- 4672 , इतर राज्यातील 4378 प्रवासी.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत लॉकडाऊनच्या काळात 488 गुन्हे दाखल,260 लोकांना अटक.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्याचा निर्णय. त्यासाठी ‘टेलीआयसीयू’ सुविधेचा वापर. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करणार असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. मेडीस्केप या डॉक्टरांच्या फौंडेशनचे यासाठी सहाय्य.

रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के, १९३५ रुग्णांची घरी रवानगी, घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ६२ हजार ७७३, आज ३८२७ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू, १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आण्याची शिफारस केल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्याद्वारे गंभीर दखल, वैद्यकीय शिक्षण संचालकांमार्फत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कारणे दाखवा नोटीस.

कोल्हापूर येथील सीपीआरमधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह 14 बेडच्या कोरोना वार्डाचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑनलाइन लोकार्पण. क्रोम क्लिनीकल रिसर्च ॲन्ड मेडीकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत या वार्डाची निर्मिती.

२० जून २०२०

राज्यातील १०० व्या कोरोना विषाणू रुग्ण चिकित्सा तपासणी केंद्राचे गोकुळदास तेजपाल रुग्णालयात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख उपस्थित. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राथमिकता देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची श्री ठाकरे यांची ग्वाही. इतर मुद्दे– कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र देशात पुढे, महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन दिल्लीत फिल्ड हॉस्पिटलची उभारणी, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या, ऑक्सिजन, डायलिसिस मशीन्स, व्हेंटिलेटर्स याची उपलब्धता करण्याबरोबरच प्लाझ्मा थेरेपीसाठी प्रयोगशील, शासकीय लॅबमध्ये १७५०० आणि खाजगी लॅबमध्ये २०५०० अशा ३८ हजार चाचण्यांची सुविधा. महाराष्ट्रातील २० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरणकक्ष, आयसीयू वार्ड तयार करण्याबरोबरच ‘समर्पित कोविड रुग्णालये, देशात सर्वात स्वस्त व सुलभ कोरोना चाचणी महाराष्ट्रात.

मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद. कोरोना विषाणुच्या संकटांचे भान ठेवून व आरोग्याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे श्री ठाकरे यांचे आवाहन.
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सायबर संदर्भात ४९१ गुन्हे दाखल, २६० व्यक्तींना अटक.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९५ हजार ९९७ पासेसचे पोलीस विभागामार्फत वितरण, ६ लाख १६ हजार व्यक्ती क्वारंटाइन, २२ मार्च ते १९ जून या कालावधीत १,३२,९३३ गुन्ह्यांची नोंद, २७,१५९ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी २३ लाख ४० हजार ३३१ रुपयांचा दंड.

कोरोनाच्या ३८७४ नवीन रुग्णांचे निदान, सध्या ५८ हजार ५४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू, आज १३८० रुग्णांची घरी रवानगी, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण- ६४ हजार १५३, आज १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४.

इतर निर्णय आणि घडामोडी

१४ जून २०२०

माजी खासदार दिवंगत माधवराव पाटील यांच्या निधनामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील आणि नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्राला आधार देणारे नेतृत्व हरपल्याची शोक भावना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत व्यक्त.

माजी खासदार आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असून राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत माधवराव पाटील यांना श्रद्धांजली.

माजी आमदार युनूसभाई शेख यांचे सोलापूरच्या विकासासाठी असलेले मोठे सोलापूरकर त्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवतील असा विश्वास व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत युनूसभाई शेख यांना श्रद्धांजली.

निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मासेमार व्यावसायिकांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांची ग्वाही. एलईडी मासेमारीबंदी साठी कायदा आणणार असल्याचे प्रतिपादन.

१६ जून २०२०

ज्येष्ठ पत्रकार, स्वांतत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे दु:ख व्यक्त. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमवला असल्याची शोकभावना व्यक्त.

पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब आणि श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन संघर्ष करणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील वैभव गेले असल्याची शोकभावना मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडून व्यक्त.

ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली, महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार, व्रतस्थ पत्रकार हरपला असल्याची शोक भावना व्यक्त.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य लीलाताई बापूसाहेब पाटील यांच्या निधनाने संपूर्ण जीवन शिक्षण चळवळीला वाहून घेतलेले समर्पित व्यक्तिमत्व हरपले असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडून व्यक्त.

माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याची शोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक शिलेदार, जेष्ठ पत्रकार, गोवा मुक्ती संग्रामातील सक्रिय सहभागी असे बहूआयामी व्यक्तिमत्व असलेले दिनू रणदिवे यांच्या निधनामुळे एक मोठा आधारवड कोसळला असल्याची शोक भावना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याद्वारे व्यक्त

दिनू रणदिवे यांच्या निधनाने गेल्या सात दशकातील घटनांचा साक्षीदार हरपला असल्याची शोक भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख यांच्याकडून व्यक्त.

दिनू रणदिवे यांच्या निधनाने ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार हरपला असल्याची शोकभावना महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून व्यक्त.

अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिसंख्य पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक आणि सेवा निवृत्ती विषयक लाभाबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना. इतर सदस्य- आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी.पाडवी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करण्याची, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, विधी व न्याय राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांची मागणी.

15 जून ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत आयोजित होणाऱ्या वन महोत्सवाच्या काळात वनविभागातर्फे नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे पुरवण्याची वनमंत्री श्री संजय राठोड यांची घोषणा.

माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे नेतृत्व हरपले असल्याची शोकभावना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून व्यक्त.

१७ जून २०२०

ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन, पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. २८ हजार ग्रामपंचायतीपैकी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा.

अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित. ठळक मुद्दे– कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य, सहवीज निर्मितीचे २००० मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात १००० मेगावाट भर घालण्याचा निर्णय, पवन उर्जा वगळता इतर अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य. शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यासाठी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचा निर्णय.पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश, शहरी घनकचऱ्या पासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास

18 जून 2020

‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली अधिकारापोटी देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत सरकारला प्रदान.

राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

इतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश.

राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांची माहिती.

19 जून 2020

भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 14 जुलै २०२० रोजी जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान. पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठित, राज्यस्तरावर एकूण तीन पुरस्कार, प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे सुतोवाच.
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 अंतर्गत 1 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.

शासनाने 2010 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2020 अंतर्गत कर्जरोख्यांची मुदत पूर्ण होत असून कर्जरोख्यांच्या अदत्त शिल्लक रक्कमेची परतफेड 21 जुलै 2020 रोजी करणार.

पिंपरी-चिंचवड(पिंपळे सौदागर) परिसरातील विराज जगताप या तरुणाच्या हत्याप्रकरणाला जातीय वळण देऊन जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजी सुभद्राबाई जगताप यांच्यासमोर गृहमंत्री श्री अनिल देशमुख नतमस्तक. संपूर्ण गावाला सोबत घेऊन जातीय वाद टाळण्यासाठी पुढे आलेल्या श्रीमती जगताप यांची त्यांनी भेट घेऊन त्यांचे श्री देशमुख यांच्यामार्फत सांत्वन.

संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकार आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची उद्धव ठाकरे यांची, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही.

२० जून २०२०

गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत पुणे येथे झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा, पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करण्याचे सुतोवाच.

You cannot copy content of this page