कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वा. हॉटेल Sea Horizon भोगवे बिच, वेंगुर्ला येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी
सकाळी 9.ते 9.30 वा. चहा व नाश्ता.
सकाळी 9.30 ते 11.00 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना.
सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन.
सकाळी 11.00 ते 11.05 वा. दीप प्रज्वलन.
सकाळी 11.05ते 11.10 वा. विभागीय आयुक्त यांचे स्वागत.
सकाळी 11.10 ते 11.15 वा. प्रास्ताविक.
सकाळी 11.15 ते 11.40 वा. विविध प्रकारचे लाभ वितरण (सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांना लाभ वितरण, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, कातकरी समाजातील लोकांना दाखले व इतर लाभार्थी यांना लाभ वितरण.
सकाळी 11.40 ते 11.50 वा. महसूल सप्ताहातील पीपीटी सादरीकरण.
सकाळी 11.50 ते 12.00 वा. सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त तहसिलदार यांचे मनोगत.
दुपारी 12.00 ते 12.10 वा. अधिकारी / कर्मचारी यांचेसोबत संवाद.
दुपारी 12.10 ते 12.15 वा. जिल्हाधिकारी यांचे मनोगत.
दुपारी 12.15 ते 12.20 वा. विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन.
दुपारी 12.20 ते 12.25 आभार प्रदर्शन.
दुपारी 12.25 ते 12.30 वा. राष्ट्रगीत व कार्यक्रम सांगता.
दुपारी 12.30 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडून सर्वसाधारण विषयाबाबत पीपीटी सादरीकरण.
दुपारी 1.30 ते 2.10 वा. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडील तपासणी नोट रिडींग.
दुपारी 2.10 ते 2.30 वा. हॉटेल लेमनग्रासकडे प्रयाण.
दुपारी 2.30 ते 4.00 वा. हॉटेल लेमनग्रास येथे राखीव.
सांय. 4.00 वा. ते 7.20 वा. कुडाळ व सावंतवाडी येथे ई-पीक पाहणी व इतर तद्अनुषंगिक पाहणी.
सायं. 7.20 ते 7.55 वा. हॉटेल अंकिता, वारखंड येथे राखीव.
सायं. 7.55 वा. मोपा विमानतळ गोवाकडे रवाना.

कर्तृत्ववान कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा थोडक्यात परिचय…

प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ४ जानेवारी २०२३ रोजी कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर नियुक्त झाले आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील २००७ बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणूनही काम केले आहे, ठाणे जिल्हाधिकारी असताना डॉ. कल्याणकर यांचा दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.

ठाणे, रायगड, चंद्रपूर आणि अकोला सारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी या पदावर वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे. डॉ. कल्याणकर यांचा जन्म १० एप्रिल १९६८ रोजी झाला असून त्यांनी एलएलएम आणि व्यवस्थापन शास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केले आहे. सन २००८ ते २०१० या कालावधीत डॉ. कल्याणकर यांनी माजी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. २०१४ मध्ये अकोला महानगरपालिका आयुक्त असताना “हरित अकोला” तसेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्या आहेत. २०१५ मध्ये नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापक पद, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद, अशा महत्त्वाच्या पदांवर काम करुन डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी पुढाकार, विदर्भातील बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करणे अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे डॉ. महेंद्र कल्याणकर यांना शासनामार्फत नेहमीच गौरविण्यात आले आहे.

यशवंत पंचायत राज पुरस्कार योजनेत ब्रम्हपुरी पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते डॉ. कल्याणकर यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी मिशन नवचेतना पंचायत राज सशक्तीकरण अभियान, कातकरी उत्थान योजना, जलपरिषद, जलयुक्त शिवार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

You cannot copy content of this page