व्हेनेझुएलात भूकंपाचा हाहाकार; १८८ मृत्युमुखी तर १५०० जखमी
काराकास:- व्हेनेझुएला देशाची राजधानी काराकास व आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. हजारो लोक मृतमुखी पडल्याची चिंता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मृतांचा आकडा २०० पार गेला असून १५०० लोक जखमी झाले आहेत. जगभरातून बचावकार्यासाठी अनेक हात सरसावले.

अमेरिकच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार, २४ जून रोजी संध्याकाळी ६ वाजून ०४ मिनिटे व ३३ सेकंदानी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का बसला आणि लगेच ३९ सेकंदाच्या अंतराने ६ वाजून ०५ मिनिटे व ११ सेकंदानी ७.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा भूकंप व्हेनेझुएला देशाच्या १०० वर्षाच्या इतिहासाततील सर्वात मोठा भूकंप होता. भूकंपाचे केंद्र काराकास शहरापासून पश्चिमेस १६० किलोमीटर अंतरावर भूगर्भात १० ते २२ किलोमीटर खाली होते.
व्हेनेझुएलामधील भूकंपाने बाधित शहरे
Caracas – कराकास, La Guaira – ला ग्वायरा, Caraballeda – काराबायेदा (किंवा काराबालेडा), Baruta – बारुता, Chacao – चाकाओ, Altamira – अल्तामिरा











