सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे!” अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.
मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हॉटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही ८० वरुन १० वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे.
प्रकल्पाची माहिती-
मालवण नगरपरिषदेची स्थापना दि. १ मे १९१८ मध्ये झालेली असून मालवण नगर परिषद ही `क’ वर्ग नगरपरिषद आहे. मालवण नगरपरिषेचे क्षेत्र ६.५ चौ. किमी आहे. मालवण शहरास सुमारे ८ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मालवण शहराची लोकसंख्या १८,६४८ (सन २०११) इतकी आहे.
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर इंडिया या मॅगझीनने फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या सुंदर जिल्ह्यातील मालवण शहर व परिसर हे एक प्रसिध्द समुद्र पर्यटनस्थळ असून येथे सिंधुदुर्ग किल्ला चिवला बीच, दांडी बीच, राजकोट, रॉक गार्डन या सोबत जवळील तारकर्ली, देवबाग, सर्जेकोट अशी मुख्य आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. मालवण येथे दरवर्षी अंदाजे ७ लाख पर्यटक भेट देत आहेत. तसेच स्कुबा डायव्हींग स्नॉर्कलिंग, पॅरासिलींग, जेट स्की, बनाना व बंपर बोट, स्पीड बोट आदी येथील प्रमुख आकर्षण आहेत. पर्यटनास व स्थानिक रोजगारास भर देण्यासाठी मालवण नगर परिषदेने मत्स्यालय व जैविविधता माहिती केंद्र प्रकल्प प्रस्तवित केलेला आहे.
नियोजित मत्स्यालय प्रकल्पापासून प्रमुख पर्यटन स्थळे:- देवबाग १० किमी, तारकर्ली ८ किमी, सिंधुदुर्ग किल्ला २ किमी, रॉक गार्डन, चिवला बिच, दांडी बिज-१ किमी. नियोजित प्रकल्पाकरिता उपलब्ध दळणवळणाची साधने:- मालवण बस स्थानक १ किमी, सिंधुदुर्ग (ओरोस) रेल्वे स्टेशन ३३ किमी, चिपी (वेंगुर्ले) विमानतळ १५ किमी.
नियोजित प्रकल्पाच्या जागा व मालकी संबंधित माहिती आरक्षण तपशिल, आरक्षण क्र.३० म्युनिसिपल प्लाझा, आरक्षण सर्व्हे क्रमांक भुमापन क्र. २४४/४ पैकी व भूमापन क्र. २२९/१४ पैकी, आरक्षित क्षेत्र, ४४०० चौ.मी. न. प. मालकिचे आरक्षित क्षेत्र ३२८५ चौ.मी. उर्वरित व भूसंपादन करणे आवश्यक असलेली क्षेत्र. आरक्षणातील उर्वरित क्षेत्र १११५ चौ.मी, पोच रस्ता क्षेत्र १६२० चौ.मी. एकुण भुसंपादन करावायचे क्षेत्र २७३५ चौ. मी.
संपादित करावयाची जागा ही खाजगी मालकीची असून, जागा मालकांनी खाजगी वाटाघाटीने जमीन नगरपरिषदेस देण्याबाबत तयार असल्याचे कळविलेले आहे. या जागेच्या भूसंपादनाकरिता आवश्यक रक्कम रु.४.५४ कोटी निधी मागणी प्रस्तावास जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत पालकमंत्री उदयजी सामंत तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांनी मान्यता दिलेली आहे.
नियोजित मत्स्यालय प्रकल्पामधील अंतर्भुत घटक, बेसमेंट -पार्किंग ५० कार, १०० बाईक. तळमजला – मत्स्यालय, प्रवेशव्दार, तिकीट काऊंटर, मत्स्यालय अंडर वाटर टनेल, पनोरमिक पनेल, टच पूल, माहिती फलक, अंडर वाटर ट्युनल, बॅक पनेल, सिलींड्रीकल टँक, ओपन कोई पाँड. जैवविविधता माहिती केंद्र. रेस्टॉरंट ६० व्यक्ती, खुले गार्डन रेस्टॉरंट २० व्यक्ती. पहिला मजला -प्रदर्शन व स्थानिक वस्तु विक्री केंद्र २५ विक्री केंद्र प्रति. ५०० चौ.फुट. दुसरा मजला, वस्तुसंग्रहायल स्थानिक कलाकृती व कलावंत.
या प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये स्थापत्य विषयक कामे, यांत्रिकी, विद्युत व पाणीपुरवठा विषयक कामे, यात्रिकी, अक्रलिक व अंतर्गत कामे जीव रक्षक यंत्रणा, अॅक्वा स्कॅपींग ई. घटक अंतर्भूत असून प्रकल्पाची ढोबळ अंदाजपत्रक रक्कम रु. २५.८६ कोटी आहे.
अपेक्षित जमा खर्च (एका वर्षाकरिता) मत्स्यालय प्रकल्पास भेट देण्याकरिता प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच शॉपिंग सेंटर, मल्टीप्लेक्स भाडे, पार्किंग शुल्क यातून नगपरिषदेस भरीव उत्पन्न मिळणार आहे.
अपेक्षित जमा रक्कम. रु. ४ कोटी ८४ लाख अपेक्षित खर्च रक्कम, रु.३ कोटी ४१ लाख १६ हजार, निव्वळ उत्पन्न जमा- खर्च रु.१ कोटी ४२ लाख ६४ हजार दरवर्षी उत्पन्नामधील अपेक्षित वाढ १० टक्के.
या प्रकल्पाची फलश्रुती, नगर परिषदेच्या वार्षिंक उत्पन्नामध्ये या प्रकल्पामुळे सुमारे रक्कम रु. १.४० ते १.४५ कोटी इतकी अपेक्षित वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १३५ स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. जैव विविधता व समुद्र विद्यान याबाबत एकाच छताखाली अद्यावत माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत “मालवण नगर परिषद क्षेत्रात मत्स्यालय उभारणे” या प्रकल्पास २५ मार्च २०२२ रोजी झालेल्या बैठकित मुख्य सचिव, अध्यक्ष उच्चाधिकार समिती, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे.