लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व सत्र न्यायाधीश एस एस जोशी, जिल्हा न्ययाधीश व सत्र न्यायाधीश-2 व्ही एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए.बी कुरणे, सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी. तिडके, प्रतिधारीत विधीज्ञ अॅड यतिश खानोलकर, अॅड. आशपाक शेख, अॅड. मनिषा नरे, अॅड. अमोल सामंत, अॅड श्वेता तेंडोलकर, अॅड आरती पवार सहाय्यक लोकअभिरक्षक, लोकअभिरक्षक कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या मोबाईल व्हॅनचा वापर करून सर्वसामान्यांपर्यत कायदेविषयक माहिती पोहोचण्यासाठी कायदेविषयक शिबीर आवळेगाव हायस्कुल आवळेगाव या ठिकाणी दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमास आवळेगाव हायस्कुलचे प्राचार्य डी. टी काळे, सरंपच श्रीम. पूर्वा सामंत, आध्यापक व विदयार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अॅड. श्वेता तेडोलकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना कौटुंबिक हिंसाचारापासून माहिलांचे सरंक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, हुंडा प्रतिबंधक कायदा, स्त्रीयांबाबत पोटगीच्या तरतुदी मुलींच्या शिक्षणाचे महत्व व महिलांना मिळणाऱ्या विधी सेवा व सवलती या सर्व विषयांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अॅड प्रणिता कोटकर, यांनी बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 या विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. आशपाक शेख यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार या विषयावर मोफत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे, यांनी विधी सेवा व सहाय्य याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात कायदेविषयक माहितीपत्रकांचे वाटप करणेत आले.

—————

गोपुरीत अंध व्यक्तीचे हक्क व अधिकार’ कायदेविषयक शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तर्फे गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे अंध व्यक्तीचे हक्क व अधिकार याबाबत कायदेविषयक शिबीर संपन्न, झाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली.

यावेळी अॅड. आशपाक शेख, प्रतिधारीत विधीज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व एस. डी. गिरकर अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग तसेच राष्ट्रीय दृष्टीहिन महासंघ कोकण शाखेचे अध्यक्ष बाबुराव गावडे व महासचिव शेखर आळवे हे उपस्थित होते. याकार्यक्रमामध्ये अंध व्यक्ती त्यांचे काळजी वाहक / सहाय्यक यांच्या मदतीने येवून सहभागी झाल्या होत्या.

अॅड. आशपाक शेख, प्रतिधारीत विधीज्ञ यांनी अंध व्यक्तीचे हक्क व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विविध शासकिय योजना / सवलती जसे की, अपंग विद्यार्थ्यांना विशेष शाळांमार्फत शिक्षण, शालांत परिक्षा पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शालांत परिक्षोत्तर शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कार्यशाळांमधून अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण, अपंग व्यक्तीना सरळ सेवेमध्ये भरतीसाठी 3 टक्के आरक्षण, पदोन्नतीमध्ये अपंग व्यक्तींना 3 टक्के आरक्षण, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, प्रशिक्षित अपंगांना व्यवसायाठी अर्थ सहाय्य, अपंग व्यक्तीना कृत्रीम अवयव व साधने पुरविणे, अपंग व्यक्तीना एस.टी. प्रवास भाड्यामध्ये प्रवास सवलत इ. बाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा व सहाय्य याबाबत सविस्तर माहिती दिली.

याप्रमाणेच वाघेरी (पियाळी) कणकवली येथे देखील ऊस तोड कामगारांसाठी कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले. ऊस तोड कामगार यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मार्फत देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा व सहाय्य याबाबत सविस्तर माहिती देऊन कायदेविषयक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना अधिक्षक एस. डी. गिरकर यांनी केली.

You cannot copy content of this page