जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी व जनजागृतीसाठी आ.डॉ.गोऱ्हे यांची शिष्टमंडळासह गृहराज्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई- कौमार्य चाचणी हा लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करुन जातपंचायतच्या विरोधात सामाजिक बहिष्काराबाबत कारवाईचा पोलीसांच्या PCR Protection of civil rights (नागरी हक्क संरक्षण) समित्यांनी जिल्हावार आढावा घेण्यासाठी अधिसुचना काढणार; अशी माहिती ना.रणजित पाटील यांनी दिली. जातपंचायत विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यास आ.डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची सामाजिक संघटना सोबत काल मंत्रालयात बैठक झाली.

महाराष्ट्र सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१७ मध्ये लागू करण्यात आला. जातपंचायतीच्या पंचाचा समाजात वाढता दबाव व कांजारभाट समाजातील नवविवाहित वधूना कौमार्य चाचणी सक्तीने घेण्यात येते; याबाबत शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सन २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती. जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पालन केले जावे व या कायद्याची जनजागृती होण्यासाठी आज आ.डॉ.गोऱ्हे यांनी शिष्टमंडळासह गृह राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी बैठक घेतली.

महाराष्ट्रात जातपंचायतीच्या आता पर्यंत घडलेल्या घटनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार जातपंचायतीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे असे या बैठकीत निदर्शनास आले. जातपंचायतीच्या पंचांचा प्रत्येक जातीमध्ये खूप मोठा हस्तक्षेप असल्याने यांच्या विरोधात गुन्हे नोंद होत नसल्याने याबाबत काही तरी कठोर पावले उचलण्याची मागणी यावेळी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली. यात प्रामुख्याने पोलीस दलाच्या Protection against violence for Women या सेलकडे नोंद घेण्यात यावी. तसेच या जातपंचायत विरोधी कायद्याबाबत पोलिसांची प्रबोधन करण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. जातपंचायत विरोधी समितीत काम करणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यातील PCR दक्षता समितीमध्ये एक सदस्यांचा समावेश करण्याची सूचना ही आ.डॉ.गोऱ्हे यांनी मांडली.

यावरती निर्णय देताना गृह राज्यमंत्री यांनी गृह विभागाला आदेश दिले की, कौमार्य चाचणी हा लैंगिक हिंसाचार म्हणून नोंद करुन जातपंचायतीच्या विरोधात सामाजिक बहिष्काराबाबत कारवाईचा पोलीसांच्या PCR — Protection of civil rights (नागरी हक्क संरक्षण) समित्यांनी जिल्हावार आढावा घेण्यासाठी अधिसुचना काढण्याबाबत आदेश दिले. विधी व न्याय प्राधिकरणमध्ये जातपंचायत विरोधी समितीचे सदस्य श्री कृष्णा इंद्रेकर यांची नियुक्ती करण्यातबाबत सूचना देण्यात आली आहे.

नागपूर जातपंच अत्याचार घटनेत कडक कारवाईचे डॉ. पाटील यांनी आदेश दिल्याचे आ.डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगितले आहे.

यावेळी व्यंकटेश भट- उपसचिव गृह, प्रमोद साईल-पोलीस उपअधीक्षक नागरी हक्क सरंक्षण, क. दै. विधाते-पुणे पोलीस सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव श्री. सं. गि. पाटील, बी.जी. गायकवाड-पोलीस निरीक्षक, मीनाक्षी राणे-पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा इंद्रेकर, अँड. नंदिनी जाधव, अँड.रंजनी गावंदे, राजेश नगरकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *