लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!

‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर

सन १९९९ पासून आजपर्यंत २ लाखपेक्षा जास्त युनिट रक्तदान!

मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई), पुणे आणि राज्यात विविध ठिकाणी आज रविवारी म्हणजेच दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी महारक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये एकूण १४ हजार २८३ रक्त युनिट जमा झाले. १९९९ पासून आजपर्यंत २ लाख पेक्षा जास्त रक्त युनिट जमा झाले असून अशाप्रकारे सेवेची सर्वोच्च कामगिरी महाराष्ट्रातच नव्हेतर देशासमोर आदर्शवत आहे.

The Camp recorded:
14,283 units of blood donated in total
7,029 of which were in #Mumbai.
1,020 units of blood donated in Pune.
6,234 units of blood donated at other locations.

You cannot copy content of this page