घुसखोरी करून बॉम्ब टाकणाऱ्या पाकिस्तानच्या तीनपैकी एका विमानाला भारताने पाडलं
नवी दिल्ली:- पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दीत तीन किलोमीटरपर्यंत आत घुसून बॉम्ब टाकण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय वायुसेनेने आक्रमक होऊन पाकचे (एफ-१६) एक विमान पाडलं आहे. दोन विमानं पळून जाण्यात यशस्वी झाली आहेत.
दरम्यान भारताने खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
पाकिस्तानने सीमेनजीकचे विमानतळ बंद ठेवले असून पाकिस्तानाने दावा केला आहे की भारताची दोन लढाऊ विमाने पाकने पाडली असून एका भारतीय पायलटला अटक केली आहे. पाकिस्तानच्या दाव्याबाबत अद्यापही भारताने आपलं म्हणणं जाहीर केललं नाही.