मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
मुंबई:- कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्यासह पु.ल देशपांडे, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अजित पवार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.