श्रीसाईधाम देवालयात श्रीरामनवमी उत्सव शासनाचे नियम-अटी पाळून साजरा

मुंबई:- जोगेश्वरी (प.) येथील प्रसिद्ध श्रीसाईधाम देवालयात श्रीरामनवमी उत्सव शासनाचे नियम-अटी पाळून साजरा करण्यात आला.

कोरोना महामारीच्या भीषण पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असल्याने शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन आणि ओशिवरा पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने ह्यावर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार नसल्याचे जोगेश्वरी (प.) येथील पाटलीपुत्र नगर, एस. व्ही. रोड येथील ओम साईधाम देवालय समितीने जाहीर केले होते. शासनाच्या नियमांचे पालन अत्यावश्यक असल्याने उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीही श्रीरामनवमी उत्सवाची परंपरा खंडित होऊ नये आणि आध्यात्मिक कार्यक्रम व्हावेत म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला.

ओम साईधाम देवालय समितीमार्फत कालपासून श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्री साईधाम देवालयात आणि देवालयाच्या आवारात अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ह्या विद्युत रोषणाईत श्री साईधाम देवालय खूपच सुंदर दिसत होते. तर आज ओम साईधाम देवालय समिती (रजि.), कॉस्मोपोलीटन को. ऑप. हौसिंग सोसायटी उत्सव मंडळ (रजि.) आणि कॉस्मोपोलीटन को. ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशन (रजि.) च्या पदाधिकाऱ्यांनी-सभासदांनी वेगवेगळ्या वेळेत एकएकटे श्रीसाईधाम देवालयात जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले व मंत्र-स्तोत्र पठण केले.

तर दुपारी श्रीमती सरोज शनिश्चर (१०२, बिल्डिंग २ सी.) यांच्या निवासस्थानी श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तो उत्सव सोशल मीडियावरून लाईव्ह प्रसारित करण्यात आला. सर्व भक्त सभासदांनी आपापल्या घरी बसून दर्शनाचा लाभ घेतला.

शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून अशाप्रकारे श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला आणि ओम साईधाम देवालय समितीने एक आदर्श निर्माण केला.

You cannot copy content of this page