आरटीओ कार्यालय लवकरच सुरु होणार!

सिंधुदुर्गच्या ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पाठपुराव्याला यश!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नियमित पाठपुरावा करून कार्यालय सुरु करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन १४ एप्रिल पासून बंद असणारे आरटीओचे कार्यालय आता अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के उपस्थितीत सुरु होणार असून खूप मोठा दिलासा वाहन धारकांना मिळणार आहे.

सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय १४ एप्रिल पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हावासियांना अनेक अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे शासनाला महसूलही मिळत नव्हता. यासंदर्भात ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच सुरु होणार असून त्यामुळे वाहन धारकांना दिलासा मिळणार आहे.

अवश्य वाचा… आरटीओकडून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागण्या मंजूर, जिल्हावासीयांना दिलासा!