जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी:- कोरोना महामारीच्या काळात तोंडाला मास्क न लावणे, चौदा दिवसाचे क्वारंटाईनचे नियम न पाळणे, शारीरिक दुरी न ठेवता गर्दी करणे अशा बेजबाबदार-बेफिकीर व्यक्तींमुळे कोरोना महामारीचा संसर्ग वाढू शकतो; अशा तथाकथित धाडसी व्यक्तींवरच कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी करावी आणि त्यांचा गौरव करावा; अशा आशयाची मागणी असणारे निवेदन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

उपहासात्मक निवेदनात राजू मसुरकर यांनी नियमांचे पालन न करता वागणाऱ्या व्यक्तींवर संताप व्यक्त करीत अनोखा उपाय सुचविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *