प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. ह्यासंदर्भात प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे तसेच जिल्हावासियांनी नियम पाळणे अत्यावश्यक आहे.

१) अनेक ठिकाणी विवाह समारंभ सुरु आहेत. त्यामुळे शारीरिक अंतर राखले जात नाही.
२) मला कोरोना होणार नाही, ही मानसिकता ठेवल्याने शासनाचे नियम पाळले जात नाहीत आणि अनेकांना कोरोनाची बाधा होत आहे.
३) सिंधुदुर्गात जिल्ह्यात राजरोसपणे गुटखा खावून सार्वजनिक ठिकाणी थुंकले जाते.
४) अनधिकृतपणे गोवा बनावटीची दारू विकली जात आहे.
५) तालुक्याच्या ठिकाणी जनता कर्फ्यू असूनही दुकाने अर्धवट उघडी ठेवली जात आहेत.
६) तालुक्याच्या बाजारात गर्दीवर नियंत्रण राखले जात नाही.
७) ज्या घरातील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव येतो त्या घरातील अन्य व्यक्ती बाहेर फिरत असतात.
८) कोरोना टेस्टचे रिपोर्ट सहा -सात दिवस मिळत नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोणा लागण होत आहे.
९) जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणात भार वाढतो.
१०) लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे.

अशा अनेक कारणांनी कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. तरी शासनाने लवकरात लवकर लसीकरण करून जिल्ह्यातील कोरोना महामारी आटोक्यात कशी येईल? ह्याबद्दल धोरण आखावे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम नव्हतीच आणि त्यात अशा महामारीने आरोग्य यंत्रणेची मर्यादा लक्षात आली. म्हणूनच प्रत्येक व्यक्तिने स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी!

-संतोष नाईक

You cannot copy content of this page